▪️मेष: कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे आणि घरात तरुण सदस्यांचे सहकार्य मिळेल. जेव्हा प्रिय व्यक्तीपासून दूर असाल तरी तुम्ही भावनीकदृष्ट्या जुडलेले असाल. एखादा जुना मित्र किंवा ओळखीचा व्यक्ती भेटू शकतो. तुमच्या व्यवसायात कोणत्याही नातेवाईकांना सहभागी करून घेणे टाळा. शुभ रंग : हिरवा.
▪️वृषभ: स्थावर मालमत्तेशी संबंधित कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी सावधानी बाळगा. या राशीच्या लोकांना मार्चच्या पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. शुभ रंग – लाल
▪️मिथुन: फार पूर्वी एखाद्याला दिलेले कर्ज परत मिळेल. पण विशेष म्हणजे याशिवाय तुम्हाला दिवसभर अनेक सरप्राईज मिळत राहतील. आज जवळच्या लोकांची मदत मिळेल. तुमच्या कामात मेहनत करत राहण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला लवकरच मेहनतीतून आर्थिक पाठबळ मिळेल. शुभ रंग – पिवळा
▪️कर्क: मार्चचा पहिला दिवस या राशीच्या लोकांसाठी अनेक रंग बदलणारा ठरेल. सुरुवातीला तुम्हाला नवीन कामात काही अडथळे जाणवतील. परंतु नंतरचा दिवस चांगला जाईल. तर काहींना आज नोकरीचा कॉल येऊ शकतो. शुभ रंग -पांढरा
▪️सिंह: आजच्या दिवसाची सुरुवात थोडी कठीण होऊ शकते. स्टॉक एक्स्चेंज आणि बांधकाम उद्योगात सहभागी होण्यासाठी दिवस चांगला आहे. तर या राशीतील काही विवाहित जोडप्यांना आजचा दिवस भांडणाचा ठरेल. दोघांमध्ये मतभेदामुळे वाद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग – निळा
▪️कन्या: या राशीतील जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस हा अडचणीचा ठरेल. शुभ रंग आकाशी
▪️तुळ: आजचा दिवस या राशीतील लोकांसाठी भारी आहे. अनेकांचे त्यांच्या कार्यक्षेत्रात कौतुक केले जाईल. अनेकजण होणाऱ्या खर्चामुळे चिंतेत राहत असतील तर ते आज त्यांचा खर्च नियंत्रणात ठेवतील. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. शुभ रंग -नारंगी
▪️वृश्चिक: राहुच्या प्रभावामुळे आजचा दिवस वृश्चिक राशीसाठी निराशा देणारा आहे. परंतु सांयकाळी तुमची निराशा दूर होईल. आज कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी विचार करा. तब्येतीकडे लक्ष द्या. मार्चच्या पहिल्या दिवशी वृश्चिक राशीचे लोक सामाजिक कार्यातून काही उद्दिष्टे साध्य होतील. शुभ रंग – निळा
▪️धनु: नोकरदार लोकांना ऑफिसच्या सध्याच्या वातावरणात लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते. तुम्हाला जे काही मिळेल ते तुमच्या मेहनतीचे फळ असेल. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागेल. शुभ रंग – आकाशी
▪️मकर: तुम्हाला तुमच्या रोमँटिक जोडीदारासोबत हँग आउट करण्याची संधी मिळेल. पूर्वी झालेले आर्थिक नुकसान भरून निघेल. तुमचा प्रियकर आज तुमच्याशी संपर्क साधू शकतो. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शुभ रंग- पांढरा
▪️कुंभ: कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात थोडी अस्वस्थता जाणवेल. या राशीतील जे लोक भागीदारीत व्यावसाय करत आहेत, त्यांना चांगला नफा मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात तुमची क्षमता अधिक मौल्यवान असेल, आज तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. शुभ रंग – तपकिरी
▪️मीन: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. मनातील चिंता दूर होण्याची आज शक्यता आहे. तर व्यावसाय करणारे काही लोक आज नवीन व्यावसाय सुरू करू शकतील.