रायगड ,1 एप्रिल – रायगडच्या किनाऱ्याजवळ आज एक संशयास्पद बोट आढळली आहे. बोटीवर पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती तेथील नागरिकांकडून सांगितली जात आहे. नौदल आणि तटरक्षक दलाकडून बोटीची तपासणी सुरू आहे.
आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास बोट दिसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई पोलिस बंदर क्षेत्राला सकाळी 10 वाजता याची माहिती देण्यात आली. ही बोट नौदलाच्या हद्दीत सापडली आहे. त्यामुळे नौदल कारवाई करणार आहे. जॉइंट ऑपरेशन सेंटरने मुंबई पोलिस आणि इतर यंत्रणांना माहिती दिली होती. सूत्रांनी सांगितले की बोट अडवण्यात आली असून त्यात पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी ही दिली आहे.