कन्नड- राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे साहेब,राज्याचे नेते उपमुख्यमंत्री मा. ना.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य भाजपा व शिवसेनेच्या वतीने संपुर्ण राज्यभर स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्राचे आयोजन करण्यात येत आहे.
त्याद्वारे आज कन्नड तालुका भाजपा व शिवसेना पक्षाच्या वतीने कन्नड शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेची सुरुवात गिरणी ग्राउंड वरून झाली. सदरील यात्रेत केंद्रीय अर्थराज्यमंत्री मा.ना.डॉ. भागवत कराड साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख भरत भाऊ राजपूत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील साहेब, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ खंबायते, जिल्हा सचिव डॉ. संजय गव्हाणे सर,भाजपा तालुका अध्यक्ष भगवान कोल्हे,बापु घडामोडे,किशोर आबा पवार, केतन काजे काकासाहेब तायडे, सुरेश डोळस,उत्तमराव राठोड, भगवान ठाकरे सर, सुभाष आबा काळे, सुनील निकम, किशोर दिवेकर,बाळासाहेब जाधव, बापु चव्हाण, गणेश घुगे, कल्याण पाटील जंजाळ भक्तराज मुळे,शहरातील प्रतिष्टीत नागरिक कालिदास उपासणी साहेब,अरुण मुळे सर, पाडळकर गुरुजी, शेखर मांडे सर, डॉ जोशी या यात्रेत सहा चित्ररथ होते, ज्याद्वारे सावरकरांच्या कार्या वर प्रकाश टाकण्यात आला होता.
सदरील यात्रा गिरणी ग्राऊंड वरून निघून पिशोर नाका मार्गे महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, लोकमान्य टिळक पुतळा, जैन स्तंभ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालून शेवट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालुन मान्यवरांच्या भाषनाणे यात्रेचा समारोप झाला.
सदरील यात्रा यशस्वी होण्यासाठी भाजयुमो तालुका अध्यक्ष प्रदीप बोडखे, अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गव्हाणे,संजय श्रीकांत,नागरे मामा, अरुण मासरे,महेश श्रीकांत आदिनी परिश्रम घेतले.