⏩4 एप्रिल 2023,नवी दिल्ली- 2022-23 आर्थिक वर्षासाठीचे प्रत्यक्ष कर संकलनाचे तात्पुरते आकडे समोर आले असून निव्वळ संकलन 16.61 लाख कोटी रुपये इतके झाले असून गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे 2021-22 मध्ये हे संकलन 14.12 लाख कोटी इतके होते. त्यात 17.63% ची वाढ झाली आहे.
⏩आर्थिक वर्ष 2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रत्यक्ष कर महसुलासाठी अर्थसंकल्पीय अंदाज 14.20 लाख कोटी रुपये इतका मांडण्यात आला होता, त्यानंतर सुधारित अंदाज मांडण्यात करण्यात आला होता आणि तो सुधारित अंदाज 16.50 लाख कोटी रुपये असा मांडण्यात आला होता. मात्र, ताज्या आकडेवारीनुसार, तात्पुरते प्रत्यक्ष कर संकलन (परताव्याचे निव्वळ) मूळ अंदाजापेक्षा 16.97% अधिक तर सुधारित अंदाजापेक्षा 0.69% ने अधिक झाले आहे.
⏩आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये प्रत्यक्ष कराचे समग्र संकलन, (तात्पुरते) परतावा वेगळा काढण्याच्या आधीचे 19.68 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. गेल्या वर्षी हेच संकलन 16.36 लाख कोटी रुपये इतके होते. यात, 20.33 % ची वाढ नोंदवण्यात आली आहे.
⏩आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सकल कॉर्पोरेट कर संकलन, 10,04,118 कोटी रुपये इतके झाले. गेल्या वर्षी हेच संकलन, 8,58,849 कोटी रुपये एवढे होते, त्यात, 16.91% ची वाढ नोंदवण्यात आली आहे.
⏩आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण वैयक्तिक प्राप्तिकर संकलन (एसटीटीसह) (तात्पुरते) रु. 9,60,764 कोटी आहे. गेल्या वर्षी हे संकलन 7,73,389 कोटी रुपये इतके होते. त्यामुळे, एकूण वैयक्तिक प्राप्तिकर संकलनात 24.23% वाढ झाली आहे.
⏩आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 3,07,352 कोटी रुपयांचे परतावे जारी करण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जारी केलेल्या 2,23,658 कोटी रुपयांच्या परताव्याच्या तुलनेत यात 37.42% ची वाढ झाली आहे.