
✴️तब्बल ६६.९ कोटी लोकांचा डेटा चोरीला
⏩नवी दिल्ली: देशातील सर्वांत मोठी डेटा चोरी झाली आहे. तब्बल ६६.९ कोटी लोकांचा डेटा चोरीला गेला असून यामध्ये कोणाचा पॅन तपशील, कोणाच्या नेटफ्लिक्स खात्याची माहिती, कुणाचा पेटीएम क्रमांक, कुणाचा वैयक्तिक डेटा, अशी पद्धतीने डेटा चोरीला गेला आहे.
⏩या प्रकरणात हैदराबाद, तेलंगणाच्या सायबराबाद पोलिसांनी डेटा चोरीप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपची तपासणी केली असता त्यात कोट्यवधी लोकांचा वैयक्तिक डेटा होता. या व्यक्तीला पोलिसांनी ३१ मार्च रोजी सुमारे ७० कोटी लोकांचा आणि कंपन्यांचा डेटा चोरून विकल्याप्रकरणी अटक केली होती.
⏩आरोपींकडून जप्त करण्यात आलेला डेटा २४ राज्ये आणि ८ मेट्रो शहरांमधील लोकांशी संबंधित आहे. दिल्लीपासून गुजरातपर्यंत या सायबर चोराकडे क्रेडिट कार्डपासून ते लोकांच्या मार्कशीटपर्यंतचा डेटा होता. हा सर्व डेटा एका वेबसाईटवर ऑनलाईन विकला जात होता.