⏩नवीदिल्ली- आयपीएलच्या १६ व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली आहे. आयपीएल सुरु होऊन आठवडा झाला नाही, तोपर्यंत कोरोनाने प्रवेश केला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. आकाश चोप्रा यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. त्याशिवाय युट्युब चॅनलवरुनही कोरोना झाल्याची माहिती दिली. कोरोनाची लागण झाल्यामुळे आकाश चोप्रा पुढील काही दिवस आयपीएल समालोचनापासून दूर असतील.
कोरोनाची लागण झाल्यामुळे आकाश चोप्रा विलगीकरणात आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस ते आपल्याला IPL 2023 मध्ये कमेंट्री करणार नाहीत. आकाश चोप्रा आयपीएल २०२३ साठी हिंदीमधून कॉमेंट्री करत आहेत. आकाश चोप्रा यांनी कम्युनिटी पोस्ट शेयर करत कोरोनाची माहिती दिली. रुकावट के लिए खेद है… कोविड ने फिर स्ट्राइक किया है. कुछ दिन के लिए कमेंट्री बॉक्स में नज़र नहीं आऊंगा. इधर भी कॉन्टेंट थोडा कम ही आ सकता है. गला खराब… तो आवाज का लोचा. देख लेना भाई लोगों… बुरा मत मानना. लक्षण हल्के हैं. भगवान का शुक्र है.
कम्युनिटी पोस्टशिवाय आकाश चोप्र यांनी ट्वीट करतही कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये चोप्रा म्हणाले की, पुन्हा एकदा मला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. थोडीफार लक्षणे आहेत. काळजी करण्याचे कारण नाही. पण पुढील काही दिवस कॉमेंट्रीपासून दूर असेल. लवकरच पुनरागमन करेन. दरम्यान, आकाश चोप्रा हिंदीमधील प्रसिद्ध समालोचक आहेत. आयपीएल २०२३ साठी आकाश चोप्रा जिओ सिनेमासाठी कॉमेंट्री करत आहेत. याआधी स्टारसोबत ते कॉमेंट्री करत होते.