✴️जनसंघापासून कार्यरत ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, ✴️जिल्हा कार्यालयात ध्वजारोहण
6 एप्रिल 2023, 6.25pm
⏩ रत्नागिरी- भाजपाचा ४३ वा स्थापनादिन आज रत्नागिरी शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपाच्या रत्नागिरी कार्यालयात ध्वजारोहण झाल्यानंतर, जनसंघापासून भाजपाचे अथकपणे कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. भाजफा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
⏩भाजपाच्या स्थापना दिनानिमित्ताने भाजपाच्या वतीने रत्नागिरी मध्ये जिल्हा कार्यालय येथे सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. अभय मुळ्ये यांच्या पौरोहित्याखाली यजमानपद शहराध्यक्ष सचिन करमरकर व सौ. मानसी करमकर या दांम्पत्याला पूजेला बसण्याचा मान मिळाला. कार्यालयाबाहेर ध्वजारोहण करुन अभिवादन करण्यात आले.
⏩या वेळी भाजपाचे संघटनमंञी शैलेंद्र दळवी, प्रदेश सचिव प्रमोद जठार, माजी आमदार बाळ माने, जिल्हा सरचिटणिस सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, मुन्ना खामकर, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, संदीप सुर्वे, संदीप रसाळ, राजन पटवर्धन, राजू तोडणकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, सौ. सुप्रिया रसाळ, सौ. शिल्पा मराठे, सौ. दीपा तोडणकर, विक्रम जैन, राजेश सावंत, सतेज नलावडे, सौ. ढेकणे, विनय मुकादम, सरपंच, नगरसेवक आदी उपस्थित होते. या वेळी जनसंघापासून भाजपामध्ये कार्यरत असलेले रामभाऊ लोखंडे, मंदार सरपोतदार, बाबासाहेब परूळेकर यांचा सत्कार करण्यात आला. विजय सालीम, श्रीकांत मांडवकर, काशीनाथ तुळसणकर, रवींद्र इनामदार, डॉ. संतोष बेडेकर, दीपक पवार यांचे पक्षातील योगदानाबद्दल आभार मानण्यात आले.
**************************
▶️जाहिरात तसेच अचूक बातम्यांसाठी
___________________________
जनशक्तीचा दबाव मुंबई
_________________________
▶️ RNINO.MAHMAR2014/59698
———————-‐—————–
▶️https://janshaktichadabav.com/
_________________________
न्यूज च्या व्हॉट्सॲप* 🪀 *ग्रुपला जाॅईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…
_________________________
_________________________
▶️
दबाव लोकशक्तिचा निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा