राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलीस व्हँनला अपघात; १७ पोलीस जखमी
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी रत्नागिरीहून राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या पोलीस व्हॅनला आडीवरेजवळ कशेळी बांध येथे आज सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. व्हॅन पलटी झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात १७ पोलीस जखमी झाले आहेत. त्यांना रत्नागिरीतील जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी मातीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी सर्वे करण्यात येणार आहे त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी मोठ्या संख्येने पोलीस दाखल झाले आहेत. बंदोबस्तासाठी रत्नागिरीहून राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या पोलीस व्हॅनला आडीवरेजवळ आज सकाळी अपघात झाला व्हॅन पलटी झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात एकूण १७ पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कुणीही गंभीर जखमी झाला नाही. जखमी पोलिसांना तातडीने विविध रुग्णवाहिकेमधून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अपघातस्थळी भेट देत अपघाताची पाहणी केली.