✴️पोलिसांसाठी प्रत्येकी ७२ निवास स्थाने असणार्या १२ मजल्याच्या ३ इमारती प्रस्तावित
⏩रत्नागिरी : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पोलिसांसाठी २२२ घरांचे भव्य निवासी संकुल साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामासाठी १२९ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच या कामाची निविदाही काढण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच पोलिसांचे निवासी संकुल रत्नागिरीत उभे राहणार आहे.
पोलीस राहत असलेल्या सध्याच्या इमारती या १९३५ सालातील आहेत. त्या अत्यंत धोकादायक आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालय दुरुस्ती आणि पोलिसांचे निवासी संकुल उभारण्याचा प्रस्ताव २०१० साली शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र पाठपुरावा करूनही हा विषय मार्गी लागला नव्हता. परंतु पालकमंत्री उदय सामंत यांनी यात प्राधान्याने लक्ष घालून अखेर या प्रकल्पासाठी निधी मंजूर करून घेतला. तसेच आता या कामाची निविदाही काढण्यात आली आहे. नव्याने होणाऱ्या या अधीक्षक कार्यालय आणि पोलीस निवासी संकुलामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय, एक राखीव पोलीस निरीक्षक कार्यालय तसेच ७२ निवास स्थाने असलेल्या तीन बारा मजली इमारती यांचा समावेश आहे.
*⏩रत्नागिरी पोलीस कार्यालय व निवास स्थाने हा प्रस्तावित प्रकल्प नेमका असा असेल*
▪️एकूण २२२ निवास स्थाने या संकुलात प्रस्तावित आहेत.
▪️एक पोलीस अधीक्षक कार्यालय, एक राखीव पोलीस निरीक्षक कार्यालय व तीन निवासी इमारती प्रस्तावित आहेत.
▪️सध्याच्या इमारती ह्या सन १९३५ सालाच्या आहेत.
▪️सन २०१० पासून दुरूस्तीचा प्रस्ताव पाठविला जात होता व याचा पाठपुरावा केला जात होता.
▪️पोलीस अधिकारी यांच्या करिता एकूण ६ व पोलीस अंमलदार यांच्या करिता २१६ निवास स्थाने असणार आहेत.
▪️प्रत्येकी ७२ निवास स्थाने असणार्या १२ मजल्याच्या ३ इमारती प्रस्तावित आहेत.