⏩देवेंद्र फडणवीसांना उद्देशून काय म्हणाल्या सुषमा अंधारे? आपल्या राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. त्यानंतर फडतूस आणि काडतूस हे दोन्ही शब्द चर्चेत आहेत. कारण देवेंद्र फडणवीस यांनी फडतूस नहीं काडतूस हूँ मै झुकेगा नही घुसेगा असं म्हणत उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या डायलॉगबाजीवर सुषमा अंधारेंनी टीका केली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे.
✴️काय म्हटलं आहे सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये?
⏩“झुकेगा नहीं घुसेगा साला हा डायलॉग भारीच होता. पण २०१६ पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर स्पायिंग करत होती. हे तुम्हाला सात वर्षे कळले नाही आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात हे काही पटत नाही राव” असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. सुषमा अंधारेंची ही पोस्ट व्हायरल होते आहे. तसंच हे ट्वीटही त्यांनी केले.
✴️उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं होतं?
⏩“एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारांनी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही.”
✴️देवेंद्र फडणवीस यांनी काय दिलं उत्तर
⏩“मला म्हणाले फडतूस गृहमंत्री, उद्धव ठाकरे फडतूस नहीं काडतूस हूँ मै.. झुकेगा नहीं साला घुसेगा.” “सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत जे राहतात त्यांच्याबाबत मला काहीही वाटत नाही. वीर सावरकर यांचा अपमान करणारे सडक्या आणि कुचक्या मेंदूचे लोक वीर सावरकरांचा अपमान करतील तोपर्यंत सावरकरप्रेमी रस्त्यावर उतरून या कुचक्या लोकांचा निषेध करत राहतील .