पाली ,24 एप्रिल-
पाली बाजारपेठे मध्ये अनेक महिने मुंबई- गोवा महामार्गाचे काम चालू आहे. त्यात बाजारपेठे मधील सेवा रस्त्याचे जे काम चालू झाले आहे पण ते काम अपूर्ण काम असल्यामुळे सध्या धुळीचा मोठा त्रास व्यापारी, निवासी घरांना सहन करावा लागत आहे. जीव मुठीत धरून त्या रस्त्यावरून दुचाकी गाडी चालवावी लागत आहे. त्यात त्या रस्त्यावरून गाड्यांची वाहतूक होत असल्यामुळे पूर्ण रस्ता चिखलमय व धुळीने माखलेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्या व पादचारी याना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. त्याचा त्रास दुकानामध्ये येणारे ग्राहक, स्थानिक लोक, रस्ता शेजारी असणाऱ्या घरातील लोकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.
या रस्त्यावरून जात असताना विद्यार्थ्यांना देखील जीव मुठीत धरून ये जा करावी लागत आहे. चालत जाताना बाजूने जाणारी गाडी सुद्धा त्यांच्या अंगावर चिखल उडवून जात आहेत. तर यावर स्थानिक बाजारपेठे मधील रहिवासी आणि दुकान धारक यांनी मुंबई गोवा महामार्ग चे जी हॅन कंपनी काम करत आहे त्यांनी लवकरात लवकर सर्व्हिस रोडवर डांबरीकरण करून द्या, अशी मागणी करत आहेत व त्यातच गटार कामही पूर्ण झाली नाहीत त्यामुळे रस्त्यावर चालत जाणारी मुले, वयस्कर व्यक्ती, किंवा अन्य कोणाचा अपघात झाला तर कंपनी जबाबदार राहणार का हा देखील जाब विचारला जात आहे. त्यामुळे सेवा रस्त्याचे डांबरीकरण व गटारे पूर्ण न झाल्यास आंदोलन करू असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे.