✴️शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Spread the love

⏩चिपळूण: रत्नागिरी जिल्हयाचे सुपुत्र शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्यावर आज त्यांचे मूळगावी  चिपळूण तालुक्यातील मोरवणे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद सुभेदार स्व. अजय ढगळे यांची अंत्ययात्रा बहादूरशेख नाका ते मोरवणे गावापर्यंत काढण्यात आली.

⏩यावेळी पोलीस दलाचे स्काऊट देखील अंत्ययात्रेसोबत होते.

अंत्यसंस्कारच्या वेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शहीद सुभेदार अजय ढगळे यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी ढगळे यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

⏩आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण यांनीही यावेळी शहीद सुभेदार अजय ढगळे यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली आणि ढगळे यांच्या परिवाराची  भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

⏩१०८ इंजिनिअर रेजिमेंटचे लेफ्टनन्ट कर्नल रोशन चव्हाण, मेजर शिवकुमार एस. एन.,2 STC पणजी गोवा सुभेदार जे. आलम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, उपविभागीय अधिकारी चिपळूण प्रविण पवार, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर, संचालक सैनिक कल्याण विभाग यांच्यावतीने दिपक मोरे आदि मान्यवरांनी यावेळी शहीद सुभेदार अजय ढगळे यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दाजंली वाहिली.

⏩यावेळी बॉम्बे इंजिनिअर ग्रुपचे ०१ ऑफीसर, ०७ जेसीओ, ३१ जवान, २ STC पणजी गोवा चे ०१ जेसीओ १७ जवान, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दलाचे जवान, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, माजी सैनिक संघटना, आजी माजी सैनिक, पोलीस गार्ड यांनी शहीद सुभेदार अजय ढगळे यांना श्रध्दांजली वाहिली.  कर्नल रोशन चव्हाण यांनी चिफ ऑफ आर्मी स्टाफ इंडियाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले. GOC, M&G Area यांच्या वतीने सुभेदार मेजर लक्ष्मण गवळी यांनी श्रध्दांजली अर्पण केली. उपस्थित इतर मान्यवरांकडून व जनसमुदायांकडून पुष्पचक्र व पुष्पहार पार्थिवावर अर्पित करण्यात आले.

यावेळी पोलीस दल आणि सैन्यदल यांनी शहीद सुभेदार अजय ढगळे यांना प्रत्येकी तीन फेऱ्यांची (फायर) करुन सलामी दिली.

⏩पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्या वीरपत्नी श्रीमती अनुजा अजय ढगळे यांना राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक सुर्पूत करण्यात आला.

⏩शहीद सुभेदार अजय शांताराम ढगळे यांच्या अंत्ययात्रेला व अंत्यसंस्काराला मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी जागची रेकी करण्यासाठी गेलेले मोरेवणे गावचे सुपुत्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे देशसेवा करत असताना शहीद झाले. शहीद अजय ढगळे हे कारगील याआधी झालेल्या लढाईमध्ये टायगर हिल जिंकणाऱ्या जांबाज बहादुर टिममध्ये देखील होते.

▶️जाहिरात तसेच अचूक बातम्यांसाठी

जनशक्तीचा दबाव

▶️ RNINO.MAHMAR2014/59698

▶️https://janshaktichadabav.com/

न्यूज च्या व्हॉट्सॲप 🪀 ग्रुपला जाॅईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…!

▶️https://chat.whatsapp.com/ExQnETG6d3REyet9BNszIt

▶️

दबाव लोकशक्तिचा निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page