⚛️भोगवेतील किनाऱ्यावर सचिन तेंडुलकर लुटतोय पर्यटनाचा आनंद…!

Spread the love

⚛️वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला वेंगुर्ला भोगवे येथील सागर किनाऱ्याला दिली भेट…!

⚛️सचिन सोबत अबालवृद्धांनी सेल्फी घेत लुटला आनंद…!

⏩️वेंगुर्ले/भोगवे : ज्या क्रिकेटपटूचे फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही इतर अनेक देशांमध्ये चाहते आहेत, असा सुप्रसिद्ध क्रिकेटर म्हणजेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर होय. असं खूपच कमी वेळा होतं की एखाद्या खेळाडूला केवळ आपल्या देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्धी मिळते.असा जगभरातील क्रिकेट प्रेमीचा लाडका व भारतीय क्रिकेट विश्वाचा देव सचिन तेंडुलकर याचे वेंगुर्ला तालुक्यातील परुळे-भोगवे गावांतील सागर किनारी रविवारी आगमन झाले.त्याने भोगवे, किल्ले निवती सागर किना-यावर पर्यटनांचा आनंद घेतला.यावेळी काही चाहत्यांना फोटो सेशनची संधी दिल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

⏩️सचिन तेंडुलकर यांचा 24 एप्रिल हा वाढदिवस आहे.आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला वेंगुर्ला भोगवे येथील सागर किनाऱ्यावर सचिन तेंडुलकर हजर झाला.तो आपला ५० वा वाढदिवस साजरा करीत आहे, त्यातुन वेळ काढून त्याने सिंधुदुर्ग जिल्हयाच पर्यटन स्थळाना भेट दिली. परुळे भोगवे येथील हॉटेल मध्ये मुक्काम केला. किल्ले निवती भोंगवे सागर किनानऱ्यावर त्याने आपल्या सहकाऱ्यासमवेत रविवारी संध्याकाळी फेर फटका मारला.यावेळी सर्वच क्रिकेट प्रेमींना त्याच्या दर्शनाने खुपच आनंद झाला, त्याने सर्वासोबत फोटो सेशन केले. क्रिकेटच्या निमिताने आपलं जगभर फिरणं झाले परंतु भोगवे – निवती सारखा सुंदर स्वच्छसागर किना-यावर फिरताना विशेष आनंद असल्याचे सचिनने सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page