⏩️नवी दिल्ली- राज्यासह देशाच्या राजकारणात सध्या प्रचंड गदारोळ पाहायला मिळत आहे. हे सर्व सुरू असताना काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणि पुलवामा हल्ल्याबाबत मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होता. त्यांच्या या आरोपांनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, यावरच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केले आहे.
इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, ‘मलिकांना राज्यपाल पदावरून पायउतार झाल्यानंतरच या गोष्टी का आठवत आहेत? त्यांनी केलेले आरोप जर खरे असतील तर राज्यपाल पदावर असताना ते या विषयावर का बोलले नाहीत? याचा विचार आता जनतेने आणि माध्यमांनी करावा. खरं तर लोक जेव्हा सत्तेत असतात तेव्हा अनेकदा त्यांचा विवेक जागा होत नाही’ अशी बाजू त्यांनी यावेळी मांडली.
⏩️काय केले होते मलिकांनी आरोप?
‘द वायर’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले होते की, पुलवामा हल्ला जेव्हा झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गप्प राहायला सांगितले. गृहमंत्रालयाच्या चुकीमुळे 40 जवानांना जीव गमवावा लागला. अजित डोवाल यांनीही याबाबत मला गप्प राहण्यास सांगत या हल्ल्याचा आरोप पाकिस्तानकडे जाईल आणि याचा फायदा निवडणुकीत होईल. असं त्यांनी सांगितले असल्याचे मलिक म्हणाले होते.