
▶️ जालना- राज्यात यंदा हवामानाचा विचित्र खेळ पाहायला मिळत आहे. कधी कडक ऊन, तर कधी अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उष्णतेने कहर केला आहे. पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा धोका कायम आहे.
या अवकाळी पावसामुळे देशातील शेतकरी अडचणीत आला आहे. पिंकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
जालना तालुक्यासह भोकरदन तालुक्यात वादळी वाऱ्यांसाह झालेल्या गारपिटीने अक्षराश झोडपून काढलं आहे. शेतात अक्षरश गारांचा खच पडला होता. तर अनेक भागात झालेल्या वादळाने आणि गारांनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा सिड्स प्लॅटच होत्याच नव्हतं झालंय तर मोसंबी बागाना ही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अगोदरच हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू असून विजांच्या कडकडाटासह वादळ वारा आणि जोरदार पाऊस झाला. अक्षरशः अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहेत. तालुक्यातील मौजे कुपटा येथे काल सायंकाळच्या सुमारास अचानकपणे सोसाट्याचा वारा आणि गाराचा पाऊस झाला यात घरावरील पत्रे उडुन गेली. तर मोठी मोठी झाडे उळमळुन पडली यासह विद्युत खांब मोडून पडले त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. गारामुळे कांदा पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नाशिक, नगर, पुणे, परभणी, हिंगोली, नांदेड या भागात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर वादळी पावसाचा इशारा यलो अलर्ट पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, जळगाव, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, बुलढाणा, अमरावती, वाशीम, अकोला, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली याभागात इशारा देण्यात आला आहे.