⏩️रत्नागिरी ,20 एप्रिल शिवजयंती उत्सव मंडळ सडामिऱ्या तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक (गवाणवाडी) सडामिऱ्या येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र आरोग्य सेवा यांच्या वतीने हे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
यावेळी तेथील डॉक्टर व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदानाकरिता तरुण/तरुणी यांनी उत्साहाने भाग घेत रक्तदान करून मंडळाला सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य आवर्जून उपस्थित होते. त्याचप्रमाणे इतर ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनीही उपस्थित होत्या. त्यामुळे सदर रक्तदान शिबिर मोठ्या प्रतिसादात पार पडले.
…………………………………….