☸️चीनमध्ये नव्या व्हायरसचा धुमाकूळ; H3N8 बर्ड फ्लूमुळे पहिल्यांदाच माणसाने गमावला जीव*

Spread the love

▶️बीजींग- चीनमध्ये आणखी एका व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. एच३एन८ नावाचा बर्ड फ्लू व्हायरस पसरत असून यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. चीनमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण चीनच्या झोंगशान शहरात एका ५६ वर्षीय महिलेला एच३एन८ बर्ड फ्लूची लागण झाली होती, तिचा सोमवारी मृत्यू झाला.

जागतिक आरोग्य संघटनेनं एच३एन८ एवियन इन्फ्लुएन्झामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना असल्याचं म्हटलं आहे. गेल्या वर्षी माणसांमध्ये याच्या संसर्गाची दोन प्रकरणे समोर आली होती. जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, महिलेला गंभीर न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला. तिला कॅन्सरसह आरोग्याच्या इतर समस्याही होत्या.

गंभीर तीव्र श्वसन संक्रमण ऑब्जर्वेशन प्रणालीच्या माध्यमातून याबाबतची माहिती मिळाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. तेव्हा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कोणालाही याचा ससंर्ग झाला नव्हता किंवा लक्षणे दिसत नव्हती. महिला आजारी पडण्याआधी प्राण्यांच्या बाजारात पोल्ट्रीच्या संपर्कात आली होती.

त्या बाजारातून एकत्र करण्यात आलेले नमुने एच ३ एवियन इन्फ्लूएन्झा व्हायरसचे होते. तर महिलेच्या घरी घेतलेले नमुने निगेटिव्ह आढळले. एच३एन८ फ्लू व्हायरस हा सामान्यपणे पक्ष्यांमध्ये आढळून येतो. मात्र घोड्यांमध्येही आढळला असून त्या दोन विषाणूंपैकी एक डॉग फ्लू तयार करण्यास सक्षम आहे. चीनमध्ये समोर आलेल्या नव्या प्रकरणांमध्ये संक्रमणाचा फक्त तिसरं आणि एखादी वृद्ध व्यक्ती बाधित होण्याचं पहिलंच प्रकरण आहे. पहिल्यांदा या व्हायरसमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page