⏩जळगावातील शेदुर्णी येथे सकाळच्या सुमारास सरस्वती विद्या मंदिर या शाळेच्या बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात बस अक्षरश: पलटली. पहूर ते शेंदुर्णी दरम्यान घोडेश्वर बाबाजवळ हा अपघात झाला. यावेळी बसमध्ये सुमारे 30 विद्यार्थी आणि शिक्षक होते. पैकी दोन शिक्षक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातात जखमी झालेले शिक्षक आणि विद्यार्थ्यांना खासगी वाहनांमधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. या अपघातातील जखमींपैकी कुणाची प्रकृती गंभीर नसल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या प्रकरणी नोंद करण्याचे काम सुरू होते. तर, अपघातामध्ये जखमी झालेले विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावर पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे.
जामनेर तालुक्यातील पहुर- शेंदुर्णी रस्त्यावर झालेल्या स्कूल बसच्या अपघातातील काही जखमी विद्यार्थ्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही विद्यार्थ्यांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या अपघातात 25 ते 30 विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर यातील काही विद्यार्थीना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान तांत्रिक अडचणीमुळे बसचा अपघात झाल्याची माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली आहे.