
राजस्थान प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष श्री भगवतसिंह चुंडावत यांची उपस्थिती
रत्नागिरी-
▪️राजस्थानी राजपुरोहित समाज, रत्नागिरी द्वारे आयोजित श्री खेतेश्वर महाराज पुण्यतिथी समारोह रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी रत्नागिरीचे माजी आमदार श्री.बाळासाहेब माने,भाजपा राजस्थान प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. भगवतसिंह चुंडावत,युवा नेते श्री.मिहीर माने आदी मान्यवर यांचा राजस्थानी पगडी देऊन सत्कार करण्यात आला.
▪️सत्काराला उत्तर देताना श्री. बाळासाहेब माने म्हणाले की, गुरुदेव श्री खेतेश्वर महाराजांचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला आज लाभले असून, राजस्थानी बांधव नेहमीच देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठे योगदान देत आहेत. आपली जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने राजस्थानी बांधवांनी कोकणात स्थिरस्थावर होऊन प्रामाणिकपणे आपले उद्यम,व्यापाराच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करून विकासाला चालना देत अर्थव्यवस्थेमध्ये भरीव योगदान दिले आहे.
येणाऱ्या काळात देखील माझ्या राजस्थानी बांधवांसाठी मी सर्वतोपरी सहकार्य करेन, मी सदैव आपल्या सोबत राहुन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींचा सबका साथ, सबका विकास याद्वारे साध्य करावयचा आहे.
▪️ राजस्थान प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.भगवतसिंह चुंडावत यांनी आपल्या मनोगतातून येणाऱ्या काळामध्ये राजस्थानी बांधवांचे प्रदेश पातळीवरील संघटन मजबूत करून, राजस्थानी बांधवांच्या कल्याणासाठी आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनातून विविध योजना राबविण्यात येतील याची ग्वाही दिली.
▪️राजपूरोहित समाजा द्वारे दरवर्षी हा समारोह मोठ्या उत्साहात पार पडतो.
यावेळी रत्नागिरी शहर तसेच कोकणातून सर्व राजस्थानी बांधव या सोहळ्यास उपस्थित राहतात.
यावेळी राजपुरोहित समाजाचे नारायणसिंह,विक्रमसिंह, भोमसिंह, काळूसिंह, हरीसिंह, चेतनसिंह, चंपालालजी कमलेश जी,परमेश्वरसिंह, जोगाराम तसेच बहुसंख्य राजस्थानी बांधव उपस्थित होते.