
▶️ मुंबई ,27 एप्रिल-
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची जोरदार चर्चा सुरू आहे. अजितदादा हेच भावी मुख्यमंत्री असल्याचं आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणत आहे.
मुंबईत आणि नागपुरातही अजितदादाच भावी मुख्यमंत्री असल्याची चर्चा रंगली आहे. अजितदादा यांचे सातत्याने बॅनर्स लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजितदादा भावी मुख्यमंत्र्यांच्या या होर्डिंग्जवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचेही फोटो आहेत. राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी हे होर्डिंग्ज लावल्याची माहिती आहे. वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाचं पक्का, असं या होर्डिंगवर लिहिलं आहे. ही होर्डिंग्ज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नजीकच्या कालावधीत नक्कीच काहीतरी घडणार आहे याचे संकेत दिले असल्याची चर्चा आहे.