☸️रत्नागिरी जिल्ह्यातील १९ शाळांना आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

Spread the love

☸️मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार यांची पत्रकार परिषदेत घोषणा

⏩रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १९ शाळांना आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे, तर एका केंद्रप्रमुखाला पुरस्कार जाहीर करण्यात आला.पुरस्कारांची घोषणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

⏩आदर्श शाळा पुरस्कारामध्ये कनिष्ठ प्राथमिक शाळा : मंडणगड – जि.प.प्राथमिक शाळा तिडे, बौध्दवाडी, दापोली – जि.प.प्राथमिक शाळा मुर्डी, क्र. 1. खेड – जि.प.प्राथमिक शाळा चिंचघर, मेटकर डाऊल, चिपळूण जि.प. प्राथमिक शाळा पोसरे क्र.2. गुहागर – जि.प. प्राथमिक शाळा जानवळे क्र. 3, संगमेश्वर -जि. प. प्राथमिक शाळा कोळंबे क्र. 1. रत्नागिरी – जि.प.प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी, लांजा – जि.प.प्राथमिक शाळा बेनी, गुरववाडी क्र. 4. राजापूर – जि. प. प्राथमिक शाळा बेणगी. वरिष्ठ प्राथमिक शाळा : मंडणगड – जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा ढांगर, दापोली – जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा – कोळबांदरे क्र. 1, खेड – जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा नांदिवली दंड, चिपळूण- जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा पोसरे क्र. 2. गुहागर – जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा काजूर्ली क्र. 2. संगमेश्वर – जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा कोंडये क्र. 2. जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणी, खाडेवाडी, रत्नागिरी- जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा गोळप क्र. 1. लांजा – जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा वाकेड क्र. 1, राजापूर – जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा चिखलगाव या शाळांना आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला.

 ⏩केंद्रप्रमुख पुरस्कार केंद्र तुळसणी व कोंडवे क्र. 1 संगमेश्वरचे केंद्रप्रमुख संतोष तारवे यांना जाहीर झाला

आदर्श शाळा पुरस्कारासाठी कनिष्ठ प्राथमिक शाळांचे 17 प्रस्ताव आणि वरिष्ठ प्राथमिक शाळांचे 16 प्रस्ताव आले होते. आदर्श शाळेची निवड करताना शाळेत दाखलपात्र मुले होण्याची टक्केवारी, उपस्थितीचे शेकडा प्रमाण, शाळा सिद्धी श्रेणी, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, शैक्षणिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक उठाव, गावाच्या मदतीने एखादा उपक्रम शिक्षक राबवत असतील तर, शाळेतील उपक्रम, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची अंमलबजावणी या निकषांचा विचार करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी किती किरण पुजार यांनी सांगितले.

⏩आदर्श पुरस्कार वितरणाची तारीख लवकरच जाहीर करू असे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सांगितले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, शिक्षण विस्तार अधिकारी संदेश कळव उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page