⏩नवी मुंबई l 07 एप्रिल: एपीएमसीत १ ते ६ एप्रिल दरम्यान कोकण आणि परराज्यातील तब्बल ३ लाख २६ हजार ८१५ पेट्या हापूस आंबा विक्रीसाठी दाखल झाला आहे. मार्च महिन्यांतही निर्यातीला चांगला वाव मिळाला. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र आवक कमी होईल, असे सांगितले जात आहे.
⏩मार्च महिन्यांत सुमारे ५० लाखहून अधिक कोकण आणि परराज्यातील हापूस मुंबई एपीएमसीत आला. यामध्ये १५०० ते ४ हजार रुपये दर कोकण हापूसला मिळाला. तर परराज्यातील हापूस हा क्रेडमध्ये येत असल्याने तो १५० रुपये किलो दराने विक्री झाला. यापाठोपाठ आता गुजरात हापूसही लवकरच बाजारात दाखल होत आहे.
⏩पहिल्यांदाच मार्चमध्ये एवढी प्रचंड आवक झाल्याने व्यापाऱ्यांचीही चांगली उलाढाल झाली. किरकोळ व्यापाऱ्यांनी कच्चा कोकण हापूस आंबा विकत घेऊन त्याला पिकवल्यानंतर तोच हापूस किरकोळ बाजारात ८०० ते १ हजार रुपये डझन या दराने विक्री केला जात आहे.
⏩एप्रिलमध्ये आवक घटणार असल्याचे व्यापारी सांगत असले तरी एप्रिलच्या पाहिल्या आठवड्यात कोकण हापूसच्या १ लाख ९७ हजार ९५८ पेट्या तर परराज्यातील हापूसचे १ लाख २८ हजार ८५७ क्रेड असे मिळून ३ लाख २६ हजार ८१५ पेट्या दाखल झाल्या. मात्र असे असले तरी अद्याप कोकण हापूसचे दर १५०० ते ४ हजार रुपये एवढेच आहेत. मे महिन्यांत हे दर कमी होतील.
⏩वाढत्या आवकमुळे निर्यातीला चांगला वाव मिळाला असून मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जात आहे. सर्वाधिक निर्यात ही सागरीमार्गाने होते. आखाती देशात कोकण हापूसला मोठी मागणी असून रमजान सणामुळे हापूसच्या मागणीत वाढ झाल्यामुळे एपीएमसीच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे.