⏩️संगमेश्वर ,21 एप्रिल- संगमेश्वर परिसरातील पैसा फंड हायस्कूल प्रशालेत व्यापारी पैसा फंड सोसायटीचे अध्यक्ष श्री अनिल शेट्ये, उपाध्यक्ष श्री किशोर पाथरे, सचिव श्री धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक श्री खामकर, सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत ब्रह्मकुमारी विद्यालय देवरुख संगमेश्वर यांच्यावतीने बी. के. राज योगिनी माधवी बेहेनजी यांचे “जल जन अभियान ( जल शक्ती मंत्रालय भारत सरकार व ब्रह्मकुमारीज विद्यालय ) अंतर्गत पाणी वाचवा जीवन वाचवा या बद्दल इ.9 वी आणि 11 वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
बी. के. माधवी बेहेनजी यांनी जल ही संपत्ती आहे. पाण्याचा अनाठायी व विनाकारण गैरवापर करू नये, पाणी भू गर्भात साठून राहण्यासाठी वड, पिंपळ, उंबर ही वृक्ष लावावीत आणि त्यांची जोपासना करावी, म्हणजे पाणी वाचवून मानवी जीवन, पशु पक्षी, प्राणी, वनस्पती या सर्वाना जगणे शक्य होईल. ही काळाची गरज आहे त्यासाठी एक प्रतिज्ञा करवून घेतली. यावेळी शिक्षक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रदर्शन व स्वागत सौ. अर्चिता कोकाटे यांनी केले.