⏩कोकणच्या हापूस आंब्याला परदेशातून मागणी
कोकणातील हापूस आंब्याला जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कोकणातील काही महत्वाच्या शहारांमध्ये हापूस आंब्याला योग्य दर मिळाला नसला तरी आखाती देशात हापूस आंब्याला चांगला दर मिळत आहे. फळ बाजारात हापूसची आवक वाढत असल्याने परदेशातून देखील हापूसची मागणी वाढत आहे. त्यामुळे या सगळ्याचा फायदा कोकणातील आंबा बागायतदारांना होत आहे.
⏩कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार?
कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी आज घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतीय निवडणूक आयोग आज सकाळी साडे अकरा वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. कर्नाटक विधानसभेसाठी एकूण 224 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या आधी या राज्यात विधानसभेसाठी शेवटची निवडणूक 2018 मध्ये झाली होती. दरम्यान या निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.
⏩शिर्डीत आजपासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ
शिर्डीतील साईबाबा मंदिरात आजपासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. या उत्सवाचे आयोजन साईबाबा संस्थानच्या वतीने 29 ते 31 मार्च या तीन दिवशी करण्यात आले आहे. अशातच उद्या (30 मार्च) रामनवमीच्या मुख्य दिवशी साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे.