⏩केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. या निर्णयानंतर सीएनजी आणि पीएनजीसारख्या इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली.
⏩सरकारच्या या निर्णयानंतर सीएनजी, पीएनजीच्या दरात किमान 10 टक्क्यांची कपात होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील बैठकीत नवीन फॉर्म्युल्याला मंजुरी देण्यात आली.
⏩केंद्र सरकार नैसर्गिक वायूवर उत्पादन शुल्क आकारत नाही. परंतु सीएनजीवर 14 टक्के उत्पादन शुल्क आकारले जाते, त्यानंतर राज्य सरकार 24.5 टक्क्यांपर्यंत व्हॅट लावते. घरगुती गॅसची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या आधारे निश्चित केली जाणार आहे. PNG ची किंमत 10% कमी होईल, तर सीएनजीच्या किंमती सुमारे 6 ते 9% कमी होतील.