☸️केंद्र सरकारने १८ फार्मा कंपन्यांचे लायसन्स केले रद्द; उत्पादन थांबवले

Spread the love

⏩नवी दिल्ली l 29 मार्च

गेल्या वर्षी उजबेकिस्तानमध्ये भारतीय कंपनीचे कफ सिरप प्यायल्याने १८ मुलांचा मृत्यू झाल्यानंतर भारत सरकारकडून औषध उत्पादन व निर्मिती कंपन्यांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. बनावट आणि निकृष्ट औषधे बनवणाऱ्या फार्मा कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने केलेल्या कारवाईत १८ फार्मा कंपन्यांचे लायसन्स रद्द केले आहे. त्यांच्यावर बनावट आणि निकृष्ट औषधांच्या निर्मितीचा ठपका ठेवण्यात आला आहे. संबंधित कंपन्यांना उत्पादन थांबवण्यास सांगण्यात आले आहे.

⏩ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून अनेक औषध कंपन्यांची तपासणी केली जात आहे. गेल्या १५ दिवसांपासून ही मोहीम सुरू आहे.  त्यांच्यावर बनावट आणि निकृष्ट औषधांच्या निर्मितीचा ठपका ठेवण्यात आला आहे. अनेक देशांतून भारतीय औषधांमुळे होणारे मृत्यू आणि आजारांच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page