▶️कर्नाटक- कर्नाटक विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी समोरच्याला चीतपट करण्यासाठी कंबर कसली आहे. दोन्ही बाजूंनी राज्यात जोरदार प्रचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातलं आणि त्या अनुषंगाने देशाच्या राजकीय वर्तुळातलं वातावरण ढवळून निघत आहे. या प्रचारमोहिमांमध्ये दोन्ही बाजूकडच्या नेतेमंडळींकडून वेगवेगळ्या आश्वासनांबरोबरच अनेक दावेही केले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या प्रचारमोहिमेत केलेल्या अशाच एका दाव्यावरून ठाकरे गटानं भाजपावर आगपाखड केली आहे.
▶️“गोरक्षकांच्या टोळ्यांच्या उन्मादाला खतपाणी”
“केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशात आणि राज्याराज्यांत भाजपच्या या विद्वेषी राजकारणाचा अनेकदा प्रत्यय आला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मुद्दय़ांचा आधार घेतला जातो. काही वर्षांपूर्वी कथित ‘गो-रक्षकां’च्या टोळ्यांच्या उन्मादाला खतपाणी घातले गेले होते. म्हणजे भाजपशासित राज्यांत गोमांस विक्री सुरू ठेवायची, यांच्या नेत्यांनी गोमांस भक्षणाची ग्वाही जाहीरपणे द्यायची, मात्र विरोधकांच्या राज्यांत याच मुद्द्यांवरून धार्मिक तेढ निर्माण करायची आणि राजकारण साधायचे हे उद्योग केले गेले. ‘सीएए’ म्हणजे ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा’ यालाही देशनिष्ठेचा मुलामा लावला गेला”, अशी टीका सामनातील अग्रलेखातून करण्यात आली आहे.
▶️“कर्नाटकात सत्ता जाणार याची भाजपाला खात्री”
कर्नाटकमधली आपली सत्ता हातून जाणार असल्याची खात्री भाजपाला झाल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे. “त्यामुळेच त्यांनी पुन्हा जातीय-धार्मिक दंगलींचा बागुलबुवा तेथे उभा करण्यास सुरुवात केली आहे. ‘कर्नाटकात काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर राज्यात घराणेशाहीचे राजकारण पुन्हा जोर धरेल आणि दंगलींमध्ये हे राज्य होरपळून निघेल,’ असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. तेच नव्हे तर भाजपच्या ‘स्टार’ प्रचारकांचा ताफाच त्या ठिकाणी म्हणे प्रचाराचा धुरळा उडवीत आहे, पण तरीही केंद्रीय गृहमंत्र्यांना कानडी जनतेला दंगलींची भीती दाखवावीशी का वाटली?” असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.
“मागील पाच वर्षे कर्नाटकात भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे ‘विकासावर मते मागा’ असा शहाणपणा इतरांना शिकविणाऱ्या भाजप मंडळींनी कर्नाटकात बोम्मई सरकारच्या पाच वर्षांच्या कारभाराचा दाखला देत मतांचा जोगवा मागायला हवा होता. मात्र त्याऐवजी केंद्रीय गृहमंत्र्यांनी जातीय दंगलींचे भूत नाचवले. कारण ना बोम्मई सरकारचे गुण गाण्यासारखे त्यांच्याकडे काही आहे, ना लिंगायत समाजाचा पाठिंबा शाबूत राहण्याची खात्री”, अशीही टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
▶️“भाजपाचा हाच फंडा”
दरम्यान, धार्मिक वाद हाच भाजपाचा फंडा असल्याचं यात म्हटलं आहे. “धार्मिक वाद, दंगलींचे भूत उकरून काढायचे आणि मतांचे धृवीकरण करीत स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा, हा नेहमीचा खेळ भाजपने कर्नाटकात सुरू केला आहे. पराभव दिसू लागला की भाजप हाच फंडा वापरतो. जातीय, धार्मिक विद्वेष पसरवायचा आणि त्या आगीवर आपल्या राजकीय स्वार्थाच्या पोळ्या भाजायच्या”, अशा शब्दांत भाजपाच्या राजकारणावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.