☸️ मुंबईत बसमध्ये मोबाईल वापरल्यास दाखल होणार गुन्हा

Spread the love

मुंबई ,28 एप्रिल-
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई अँड ट्रांसपोर्ट (बेस्ट) ने आपल्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या लोकांना विना हेडफोन मोबाइल फोनवर मोठ्याने बोलणे आणि मोबाइल उपकरणांवर ऑडियो/व्हिडिओ एक्सेस करण्यावर बंदी आणली आहे. बेस्टकडून सांगण्यात आले आहे की, सहप्रवाशांच्या सुविधेसाठी व प्रवाशांच्या तक्रारीनंतर बेस्ट प्रशासनाने हा निर्णय घेतला गेला आहे. बेस्टने याबाबतची नियमावली जारी केली आहे. नव्या नियमानुसारबेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना मुंबई आणि उपनगरांमध्ये सार्वजनिक परिवहनामध्ये आपल्या मोबाइलवर व्हिडिओ पाहताना किंवा ऑडिओ ऐकताना हेडफ़ोनचा वापर आवश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम कलम ३८/११२ नुसार कारवाई केली जाणार आहे.

उपक्रमाच्या बसगाडयांमधून प्रवास करणा-या बहुतांश प्रवाशांकडे मोबाईल असतात व त्याचा वापर मुक्तपणे करण्यात येतो. अनेक प्रवासी जोरजोरात मोबाईलवर बोलत असतात. तसेच काही प्रवासी मोबाईलवर ऑडिओ, व्हिडीओ ऐकत, बघत असतात. यावेळी आवाजाची पातळी जास्त असल्यामुळे बसमधील अन्य प्रवाशांना त्याचा त्रास होतो, असे यामध्ये म्हटले आहे. या प्रकारांमुळे बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये ‘इयरफोन शिवाय मोबाईलवर ऑडिओ / व्हीडीओ ऐकण्यास बघण्यास तसेच मोठया आवाजात बोलण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page