
▶️पुणे,27 एप्रिल-
केनिया संघाने भारताला अंतिम लढतीत पराभूत करताना सहाव्या विश्वकरडंक रोलबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मागील विश्वकरंडक स्पर्धेत भारताने अंतिम लढतीत केनियाला पराभूत करताना विजेतेपद पटकावले होते. यास्पर्धेत मात्र केनियाने भारतावर विजय मिळविताना पराभवाची परतफेड केली.
म्हाळुंगे – बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियम येथील मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत केनिया संघाने भारताला ७-४ असे पराभूत केले. मध्यंतराला केनिया संघ ४-२ अशी २ गोलची आघाडी घेतली होती.
केनिया संघाकडून ग्रीफिंसने ३ (१.२५, २३.२५ व २४.००), बोनफेसने २ (२१.०० व २२.००) तर मोझेसने (१०.३६) व ब्रीयान (१२.२८) यांनी प्रत्येकी एक गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून सचिन सैनीने २ (२२.४० व ३८.२०), आदित्य सुतार (५.०८) व आकाश गणेशवाडे (११.२०) यांनी प्रत्येकी १ गोल केला.