
▶️रत्नागिरी:
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र जी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत रत्नागिरी भाजपा चा विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 15 एप्रिल शनिवार रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या स्वयंवर मंगल कार्यालय येथे विजय संकल्प मेळाव्याला मंत्री रविंद्र चव्हाण साहेब मार्गदर्शन करणार आहेत. चव्हाण साहेब कॅबिनेट मंत्री झाल्या नंतर प्रथमच भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित होत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या विजयाचा संकल्प घेऊन भाजपा तयारी करत आहे. रत्नागिरी ही विजया साठी सिद्ध व्हावी, कार्यकर्ते आणि संघटनेत चैतन्य निर्माण व्हावं या साठी रवींद्र चव्हाण साहेब काय कानमंत्र देतात हे पाहणे रोचक ठरणार आहे .
रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, राजापूर मधून बूथ स्थरावरिल कार्यकर्ते बूथ प्रमुख शक्तिकेंद्र प्रमुख तालुका स्थरिय पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते यांना या मेळाव्या साठी निमंत्रित करण्यात येत आहे.या साठी तालुका आणि शहर अध्यक्ष यांना नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली असून बूथ सशक्ती कारणांचा महत्व पूर्ण संघटनात्मक कार्यक्रम, विजयाचा संकल्प राजकीय परिस्थिती अश्या अनेक विषयांवर रवींद्र चव्हाण साहेब मार्गदर्शन करतील. तसेच केंद्र शासन राज्य शासन यांच्या योजना कार्यक्रम या बाबतही मंत्री महोय उहापोह करतील आगामी नगरपरिषद जिल्हा परिषद निवडणुका या संदर्भात ही दिशा निश्चित केली जाईल.भाजपाचे जिल्हा अध्यक्ष दीपक पटवर्धन हे ही या मेळाव्याला मार्गदर्शन करतील.
भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी विविध आघाड्या मोर्चे यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश कुळकर्णी यांनी केले आहे.