☯️शास्त्रज्ञ कुरुलकरने अनेक फाइल्स, व्हिडिओ व फोटो ISI ला केले शेअर

Spread the love

▶️ मोबाईल, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह मधील डेटाही केला डिलीट

▶️ अनेक महिलांच्या भेटीगाठी घेतल्याचे उघड

मुंबई ,10 मे 2023- डीआरडीओचे संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याचे अनेक
कारनामे आता उघड होत आहेत. पाकिस्तान गुप्तचर संस्था आयएसआयला देशातील गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून एटीएसने त्याला अटक केली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपत असल्याने कुरुलकर याला न्यायालयात हजर करणार आले होते. प्रदीप कुरुलकर हे ई मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, तसेच ते अनेक महिलांना भेटत असल्याचं एटीएसच्या तपासात समोर आले आहे.

कुरुलकर यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञ पदाचा गैरवापर करत त्यांच्याजवळची संवेदनशील सरकारी माहिती पाकिस्तानला पुरवत होते. त्याचबरोबर प्राथमिक अंदाजानुसार ते हनी ट्रॅपमध्ये सापडल्याने पाकिस्तानला हवी ती माहिती देत असल्याचा एटीएसला संशय आहे.

प्रदीप कुरुलकर यांना अटक केल्यानंतर एटीएसने त्यांच्या सर्व वस्तू जप्त करून त्यांचे मोबाईल, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातुन ही धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमधे अनेक महिलांना भेटत होते. त्याचाही तपास करण्याची गरज असल्याचं एटीएसने न्यायालयात सांगितलं. प्रदीप कुरुलकर यांच्या बॅक अकाउंटमधे बाहेरच्या देशातून पैसे आल्याचा संशय असून याचाही तपास केला जाणार आहे. कुरुलकर यांनी सरकारी पासपोर्टचा उपयोग करुन पाच ते सहा देशांना भेटी दिल्याचं एटीएसच्या तपासात उघड झालं आहे.

प्रदीप कुरुलकर यांनी त्यांच्या मोबाईल, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह मधील काही डेटा डिलीट केल्याचे समोर आले होते. ती माहिती नक्की काय होती तसेच तो डेटा त्यांनी पाकिस्तानला पुरवला आहे का, याचा तपास केला जाणार आहे. न्यायालयाने त्याची एटीएस कोठडी १५ मे पर्यंत वाढवली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page