मुंबई- बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने तिच्या अधिकृत ट्विटर आणि इंस्टा अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. आयफोन बनवणाऱ्या अॅपलचे कंपनीचे सीईओ टीम कुक सध्या आपल्या देशात आहेत. भारतातील पहिल्या अॅपल स्टोअरच्या उद्घाटनाकरिता ते भारतात आले आहेत.
अॅपलचे कंपनीचे सीईओ टीम कुक यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ते उद्योगपती मुकेश अंबानी यांना त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच अँटिलियाला दीक्षित हिला देखील जाऊन भेटले आहेत. त्याचबरोबर त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध स्ट्रीट फूड वडा पाववर देखील चांगलाच ताव मारला आहे. तसेच बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत टीम कुक वडापाव खात असतानाचा फोटो व्हायरल झाला आहे.
टीम कुक यांनी हा फोटो शेअर करत धकधक गर्लचे आभार मानले आहेत. टीम कुक म्हणतात, ” मला माझ्या पहिल्या वडा पावची ओळख करून दिल्याबद्दल माधुरी दीक्षितचे खूप खूप आभार. हे खूपच चविष्ट आहे. माधुरीने देखील हा फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत कॅप्शन दिले आहे की, “मुंबईत स्वागत करण्यासाठी वडा पाव खाऊ घालण्यासारखा उत्तम पर्याय नाही.
याबरोबरच सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील व्हायरल केले आहे. यामध्ये आकाश अंबानी आणि ईशा अंबानी टीम कुकसोबत गेटजवळ दिसत आहेत. टीम कुक मंगळवारी मुंबईमध्ये भारत देशात पहिले अॅपल स्टोअरचे उद्घाटन करणार आहेत.
हे अॅपल स्टोअर मुंबईमधील बीकेसी वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू होत आहे. एवढंच नाही तर टीम देशात दौऱ्याच्या दरम्यान पंतप्रधान मोदींना देखील भेटतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच टीम कुक यांचा हा भारत दौरा खास असणार असल्याची यात काही शंका नाही.