⏩नवी दिल्ली,21 एप्रिल- आपल्या मागण्यांच्या निषेधार्थ वकील संपावर जाऊ शकत नाहीत, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. न्यायपालिकेच्या कामकाजात त्यामुळे बाधा येऊ शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. वकिलांच्या काही समस्या असू शकतात. त्यावर मार्ग काढण्यासाठी देशातील सर्व उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समस्या निवारण समिती स्थापन करण्याचे आदेश आम्ही देत आहोत, असे न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने सांगितले.
डेहराडून जिल्हा वकील संघटनेने आपल्या काही मागण्या मार्गी लावण्यासाठी याचिका दाखल केली असून, त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली.
…………………………………….