
⏩रत्नागिरी,21 एप्रिल-
पवित्र रमजान महिन्याच्या शेवटी रमजान ईद (ईद-उल-फित्र) उत्साहात साजरी केली जाते. यासाठी तयार करण्यात येणा-या विशेष मेनु ‘शिरखुर्मासाठी’ लागणारा सुका मेवा खरेदीसाठी गेले दोन दिवस बाजारपेठेत लगबग वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत काही वस्तूंच्या दरात किंचित घसरण झाली आहे. ईद उद्या शनिवार दि.२२ एप्रिल रोजी साजरी होण्याची शक्यता (चंद्रदर्शनावरुन) वर्तविण्यात येत असल्यामुळे विविध साहित्यांची खरेदी केली जात आहे.
‘ईद-उल-फित्र’चा खास मेनु म्हणजे ‘शिरखुर्मा’. या दिवशी घराघरात ‘शिरखुर्मा’ तयार केला जातो. यासाठी काजु, बदाम, पिस्ता, अक्रोड, मनुका, चारोळी, टरबुज बी, खरबुज बी, तूप, खवा, शेवई, खजुर, दुध आदी साहित्याची मागणीही मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
यंदा दि. २६ मार्चपासून रमजान महिन्यास प्रारंभ झाला. मार्च हिट आणि एप्रिलमधील उन्हाचा तडाखा सुरू असतानाही ईद उत्साहात साजरी होत आहे. मुस्लिम समाज बांधव अल्हाकडे जगाच्या कल्याण दुआ मागत आहेत. आपला देश एका नाजुक वैचारिक परिस्थितीतून जात आहे. त्यातून बाहेर पडून एकासंघ भारताच्या निर्मितीसाठी शक्ती द्यावी, अशी प्रार्थना करण्यात येत आहे.
मुस्लिम दिनदशिर्केचे वर्ष (हिजरी) हे चंद्राच्या कलेवर अवलंबुन असते. त्यामुळे पौर्णिमा व अमावस्येंला हिजरीमध्ये खुप महत्व आहे. दि. २३ मार्च रोजी चंद्रदर्शन झाले आणि शाबान महिना संपूण रमजान महिना सुरु झाला. आता चंद्राचे दर्शन आज शुक्रवारी सायंकाळी झाले तर ईद शनिवारी अन्यथा शनिवारी चंद्रदर्शन झाले तर रविवारी ‘ईद-उल-फित्र’ साजरी करण्यात येईल.
…………………………………….