⏩ट्विटरच्या ज्या युजर्सला सशुल्क न भरता ब्लू टिक मिळाले होते अशा सर्व युजर्सचे ब्लू टिक ट्विटरने काढून टाकले आहे. गुरूवारी रात्री १२ वाजल्यापासून ब्लू टिक हटवण्यात आल्या असूव यामध्ये भारतातील दिग्ग्जांचा समावेश आहे. ट्विटरने शाहरूख खान, सलमान खान, स्टार क्रिकेटर्स विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी, अजित पवार, राहुल गांधी तसेच अनेक कॉंग्रेस – भाजप नेत्यांच्या ब्लू टिक हटवल्या गेल्या आहेत.
⏩एलॉन मस्कने १२ एप्रिलनंतर लीगेस व्हेरिफाई़ड ब्लू टिक हटवण्यात येतील अशी घोषणा केली होती. यानंतर गुरूवारी हा नियम लागू करण्यात आला आगे. त्यामुळे आता कोणालाही ब्लू टिक हवी असल्यास दर महिन्याला ट्विटरकडून विशिष्ट रक्कम आकारली जाणार आहे.
⏩ब्लू टिक हटवलेल्या युजर्सच्या यादीत अभिनेते, खेळाडू, राजकारणी यांचा समावेश आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, शाहरूख खान, सलमान खान, अक्षय कुमार ते क्रिकेटपटू विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि भारतीय राजकारणातील मोठी नावांचा या यादीत समावेश आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटर अकाऊंटवरून सुद्धा ब्लू टिक हटवण्यात आली आहे.