☯️ज्ञानप्रबोधिनी, चिपळूण केंद्रावरील विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग.
▶️संगमेश्वर._ सांस्कृतिक चळवळ जपणाऱ्या कलांगण परिवार आणि माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहयोगाने झालेल्या ‘शुभ्र सुगंधित मने’ या सांगितिक कार्यक्रमाला उपस्थित रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. या संपूर्ण कार्यक्रमात ज्ञानप्रबोधिनी निगडी, पुणेच्या चिपळूण संपर्क केंद्रावरील विद्यार्थी, तसेच माखजन इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थीही सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लोकप्रिय कवितांचे सांगितिक सादरीकरण केले. तर शतकोत्तर रौप्य महोत्सवी ‘संगीत शारदा’ या नाटकातील नाट्यप्रवेश सादर केला. उपस्थितांनी गाण्यांना व नाट्य प्रवेशाला ‘वन्स मोअर’ची दाद दिली.
माखजन इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात झालेला हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. या कार्यक्रमात गंधार संकपाळ, श्रावणी संकपाळ, सूरज पाटणकर, सृष्टी तांबे, ऋचा पातकर, पवन मोहिते, काव्या बागवे, आदित्य पानगले, अथांग कारंडे, अनुष्का कदम, रिया जाधव, हर्षदा चव्हाण, यशोदीप मोहरीर, गंधार पुरोहित, कनक म्हापुस्कर, मुग्धा जोशी, अक्षता दिंडे, कैवल्य मुसळे, ओजस कुंटे, मेघ देवळेकर, सुखदा साठे, जुईली केळकर, कल्याणी साठे, वेदिका मोरे आदींनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमावेळी माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आनंद साठे यानी ‘कलांगण’चे अमोल लोध यांना सन्मानित केले. हा कार्यक्रम ज्ञानप्रबोधिनीचे कार्यकर्ते व संस्थेचे संचालक पराग लघाटे यांनी आयोजित केला होता. त्यांची मध्यंतरात, कलांगण कार्यकर्ते व प्रख्यात निवेदक निबंध कानिटकर यांनी मुलाखत घेतली.
या कार्यक्रमाला माखजन पंचक्रोशीसह संगमेश्वर तालुक्यातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्रीनिवास पेंडसे, दिलीप जोशी, श्रीकांत फाटक, संदेश पोंक्षे, मनोज शिंदे, स्वप्नील बापट, प्रकाश रेडीज, कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष आनंद साठे यांनी आभार मानले.