☯️उद्योग मंत्री उदय सामंत रविवारी रत्नागिरी दौऱ्यावर

Spread the love

⏩रत्नागिरी, दि.22 : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

▶️रविवार 23 एप्रिल 2023 रोजी पहाटे कोंकण कन्या एक्सप्रेसने (गाडी नं.२०१११) रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण.

▶️पहाटे 05.00 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.

▶️सकाळी 09.30 वाजता हिरो जेन्युअन पार्टस् विक्री केंद्रास सदिच्छा भेट. (स्थळ : प्लॉट नं. सी-२३२/१९४, एम.आय.डी.सी. मिरजोळे, रत्नागिरी).

▶️सकाळी 10.00 वाजता महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : जयेश मंगल पार्क, ५८५/ए, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी).

▶️दुपारी 12.30 वाजता राजापूर नगर परिषद हद्दीतील विविध विकासकामाचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. 1. विशेष रस्ता अनुदान योजना सन २१-२२ व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) सन २२-२३ कामे. 2. संस्थान श्री देव धूतपापेश्वर मंदिराचे संवर्धन व सुशोभिकरण काम (स्थळ : राजापूर नगर परिषद, ता. राजापूर, रत्नागिरी)

▶️दुपारी 04.00 वाजता कृतज्ञता सोहळा व न. प. शाळा क्र. १५ दामले विद्यालय, रत्नागिरी शाळेचा शतक महोत्सव शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : स्वा. सावरकर नाट्यगृह, मारूती मंदिर, रत्नागिरी).

▶️सायंकाळी .5.00 वाजता भोके गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : आरोग्य उपकेंद्र भोके, मायंगडेवाडी, रत्नागिरी.)

▶️सायंकाळी 06.00 वाजता दांडेआडोम गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.(स्थळ : ग्रामपंचायत कार्यालय, दांडेआडोम. रत्नागिरी).

▶️सायंकाळी 07.00 वाजता खेडशी गावातील विविध विकासकामांचे भूमिपुजन व उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : माध्यमिक भवन, लक्ष्मीनारायण नगर, खेडशी, रत्नागिरी) सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.

▶️रात्रौ 10.50 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे प्रयाण.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page