रत्नागिरी, प्रतिनिधी :
महामानव, घटनाकार, भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रत्नागिरी जिल्हा कांग्रेसच्यावतीने त्यांच्या प्रतिमेला कांग्रेस भवन येथे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा कांग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष हारीस शेकासन, सहकार प्रदेश उपाध्यक्ष श्री बंडूशेठ सावंत, शहर अध्यक्ष रमेश शाहा, अनूसूचित जाति जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ आडिवरेकर, शहर उपाध्यक्ष रफिक मुल्ला, शहर सरचिटणीस रवि खेडेकर आदी उपस्थित होते.