▶️नवी दिल्ली ,25 एप्रिल-
भारतीय उद्योगपती रतन टाटा यांना आँस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर आँफ ऑस्ट्रेलियाने सन्मानित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी ओ फेरेल यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत ही माहिती दिली.
टाटा समुहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी भारतासोबत आँस्ट्रेलियातही उद्योग जगतात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना ऑर्डर आँफ ऑस्ट्रेलियाने सन्मानित करण्यात आल्याचे बॅरी ओ फेरेल यांनी ट्विटमध्ये सांगितलं. फेरेल यांनी आपल्या ट्विटमध्ये रतन टाटांना हा पुरस्कार प्रदान करतेवेळीचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
टाटा पॉवर ओडिशा डिस्ट्रिब्युशन लिमिटेड (टीपीएसओडीएल) चे कार्यकारी राहुल रंजन आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, उद्योगपती रतन टाटा यांचे योगदान जगभरात आहे. त्यांच्याकडील नेतृत्त्वगुण आणि दूरदृष्टीमुळे ते आज यशोशिखरावर आहेत. त्यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान मोठे आहे. स्वत: च्या उत्पन्नातील ७० टक्के हिस्सा ते समाजासाठी दान करतात, हा त्यांचा मोठेपणा आहे.