
⏩राजापूर 17 एप्रिल राजापूर तालुक्यातील पांगरे, ससाळे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याने येथील एका शेतकऱ्याचा बैल दिवसाढवळ्या ठार केला आहे.
गेली दोन- तीन दिवस पांगरे व ससाळे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार चालू होता. शिवाय रात्रीच्या डरकाळ्याही फोडत असल्याचे ग्रामस्थांनी ऐकल्या होत्या. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या संदर्भात वनविभाग व तलाठी मीनल गावडे यांना माजी सरपंच बाळा सावंत यांनी खबर दिली आहे. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी यांनी पंचनामा केला.