
▶️ मुंबई- आज सत्ता संघषर्घाचा निकाल लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे. अशात ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊतांनी सोशल मीडियावर एक ट्वीट शेअर केलं आहे. राऊतांच हे ट्वीट चांगलच चर्चेत आलं आहे.
काय झाडी..काय डोंगर.. काय हिरवळ..आज वाट पाहतोय तुमची..नरहरी झिरवळ, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे. मात्र आज सकाळपासूनच झिरवळ नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांचे दोन्ही फोन बंद असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला किंवा विधानसभा अध्यक्षांकडे तो निर्णय आला तर काय होणार याबाबात राज्यासह देशातील नागरिकांना उत्सुकता लागली आहे. यावर विधासभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
नरहरी झिरवळ म्हणाले कि, त्यावेळी मी जो निर्णय दिला, तो कुठल्या राजकीय हेतूने दिलेला नाही. कारण विधासभा हे एक सार्वभौम सभागृह आहे आणि ते घटनेनुसार चालते, धोरणावर आणि नियमांनुसार चालंत. त्यापद्धतीने मी योग्य तो निर्णय दिलेला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की न्यायदेवाता माझ्या निर्णयाचा नक्कीच विचार करेल की मी दिलेला निर्णय योग्य आहे, असे झिरवळ म्हणाले.