☯️ नवी दिल्ली- केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिंदे यांनी सोमवारी रात्री स्वतः याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.
याआधी ज्योतिरादित्य शिंदे यांचे पुत्र महाआर्यमन शिंदे यांना देखील १३ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली. त्यांना खोकला आणि सर्दीचा त्रास झाल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ते सध्या जयविलास पॅलेसमधील विलगीकरणात आहेत. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने संपूर्ण कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.
आपल्या ट्विटमध्ये ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, ‘डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेल्या कोविड-१९च्या तपासणीत माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांनी खबरदारी घ्यावी. जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन स्वतःची चाचणी करुन घ्यावी अशी विनंती ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या ट्विटर संदेशात केली आहे.