
▶️ भिवंडी- भिवंडीतील वलपाडा परिसरात एक तीन मजली इमारत कोसळली आहे. आज शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवासी अकडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या वलपाडा परिसरात तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर एक गोडावून आहे. या ठिकाणी काही कर्मचारी जेवणासाठी थांबले होते. मात्र, दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही इमारत कोसळली. दरम्यान, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
तसेच काही लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखालून पाच ते सहा जणांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी एनडीआरएफच्या जवानांनाही मदतकार्यासाठी बोलावण्यात आले आहे.