☯️ सेतू आयोजित दिव्यबंध कर्णबधिरांसाठी वधुवर परिचय मेळावा

Spread the love

⏩ 24 एप्रिल/रत्नागिरी : सेतू या संस्थेतर्फे कर्णबधिरांसाठी वधुवर परिचय मेळावा रविवारी ३० एप्रिलला आयोजित केला आहे. कर्णबधिरांसाठी होणाऱ्या या मेळाव्याचा लाभ घ्या व सुयोग्य जोडीदाराची निवड करता येईल. यात रत्नागिरी जिल्ह्यातील कर्णबधिरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

सेतू ही गेली १६-१७ वर्षे कर्णबधिरांच्या व सामाजिक क्षेत्रातही कार्य करणारी संस्था करवीरवासीयांच्या परिचयाची आहेच. कर्णबधिरांचे व सेवावस्तील मुलांचे शैक्षणिक वर्ग, कौशल्य विकास वर्ग, जिल्हास्तरीय स्पर्धा, शिक्षकांसाठी सेमिनार्स या कार्यात संस्थेचा सर्वार्थाने सहभाग असतो. या मेळाव्यासाठी रू. ५०/- शुल्क ऑनलाइन खालील बँक खात्यावर भरून त्याचा स्क्रिनशॉट पाठविणे आवश्यक आहे. A/C Name – SETU (Social Empowerment Through Unity)
Bank Name- Panchganga Bank, Kolhapur, A/C no.- 0020001030019626, IFSC Code – IBKL0464PNS

मेळाव्याला येताना सोबत एकच व्यक्ती येऊ शकेल. फॉर्मवरील सर्व माहिती योग्य व अचूक भरावी. मेळाव्यासाठी दुपारी २.०० वाजता उपस्थित राहावे. मेळावा राधाकृष्ण मंदिर, शाहूपुरी, कोल्हापूर येथे दु.२.०० ते सायं. ६.०० या वेळेत होईल. https://forms.gle/YtpSmMjyJebQXHTr6 या लिंकमध्ये माहिती भरावी. अधिक माहितीसाठी सौ. उषा कुलकर्णी ९८८१४७४१४३, सौ. स्नेहल सप्रे ९९२०३८२१८९ स्वाती गोखले ९८२२६७९७७४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page