मुंबई ,29एप्रिल 2023-
माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक
रविवार दि. ३० एप्रिल २०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे, मुंबई विभाग आपल्या उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक (Mega Block) पुढीलप्रमाणे परीचालीत करणार आहे.
सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक सुरु राहील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Mega Block) मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील व त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याहून पुढे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.
ठाण्याहून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात (Mega Block) येतील व त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. पुढे अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर (Mega Block) सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक राहील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी, बेलापूर, पनवेल करीता सुटणारी तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून (Mega Block) सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर (Mega Block) मार्गावरील सेवा बंद राहतील.
तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा सुमारे २० मिनिटांच्या फरकाने सुरु राहतील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.