▶️मुंबई ,26 एप्रिल-
महाराष्ट्रासह तेरापेक्षा जास्त राज्यांचा मलेरिया डेंग्यूचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या आरोग्य वार्ता विभागाने दिला आहे. सध्या राज्यात कधी अवकाळी पाऊस तर कधी उन्हाचा चटका बसत आहे. या वातावरणामुळे मलेरियाचे जंतू व डेंग्यूचे विषाणू सक्रिय झाले आहे. हवामानातील बदल आपल्या आरोग्यवर तत्काळ परिणाम करतात.
आजवर हे अलर्ट वैद्यकीय विभाग देत होता; मात्र आता हवामान शास्त्र विभाग देत आहे. भारतीय हवामान विभागाने ही सेवा सुरू केली असून यंदाचा पहिला मलेरियाचा अलर्ट नुकताच दिला आहे. जम्मू-काश्मिरपासून तामिळनाडू राज्यासाठी हे अलर्ट देण्यात आले आहे.
सध्याच्या कालावधीत महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, पंजाब, त्रिपुरा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, मिझोराम, त्रिपुरा, झारखंड, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश वाढीव तापमानाचा आरोग्यावर लगेच परिणाम दिसतो. त्यामुळे विशेष बुलेटीनेद्वारे रोज हवामान विभाग आता आरोग्याचे अलर्ट देत आहे. याचा फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे.