
लांजा ,29 एप्रिल-
शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व कला या क्षेत्रांमध्ये सक्रीय असलेल्या महामाया उत्सव समितीचा यावर्षीचा स्नेहसंमेलन मेळावा दि. २९ एप्रिल रोजी परेल येथील भावसार सभागृहामध्ये ४ वा. आयोजित करण्यात आला आहे. यावेळी स्वर किरण सांगितीत मंच पुणे तर्फे `स्वर बहार’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
महामाया उत्सव समिती १९९० पासुन शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व कला या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. समितीच्यावतीने दरवर्षी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही दि. २९ एप्रिल रोजी परेल येथील भावसार सभागृहा मध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महामायेच्या पुजनाने संमेलनाला सुरुवात होईल. त्यानंतर हळदीकुंकू समारंभ, गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्याना बक्षिस वितरण केले जाईल. सरपंच – संजय देसाई यांचा सत्कार केला जाईल. शेवटी स्वर किरण सांगितीत मंच पुणे तर्फे स्वर बहार हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
दरम्यान, रंगभूषाकार जयवंत तुकाराम देसाई, लघुउद्योजक शांताराम बाळाजी देसाई या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हे स्नेहसंमेलन संपन्न होणार आहे.