⏩ मुंबई ,03 मे- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भीतीने तीन पक्ष एकत्र आलेत, त्याला हे वज्रमूठ वगैरे म्हणतात, अशा शब्दांत भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. शिवाय मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराची जंत्री भविष्यात उघड होणार म्हणून अगोदरच झोळी पसरून सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे यांची वज्रमूठ, अशी टीकाही शेलारांनी केली.
भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेवर हल्लाबोल केला आहे. आमचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भीतीने तीन पक्ष एकत्र आलेत, हे वगैर त्याला हे वज्रमूठ म्हणतात, पण ही दुर्बळांची भयभीत सभा आहे. तिघे एकत्र आले तरी भय संपले नाही. अजूनही गोळाबेरीज सुरू आहेच. दुसरे कारण मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराची जंत्री भविष्यात उघड होणार म्हणून अगोदरच झोळी पसरून सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे यांची वज्रमूठ, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी मविआवर निशाणा साधला.
छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील वज्रमूठ सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर रविवारी महाविकास आघाडीची मुंबईत तिसरी वज्रमूठ सभा पार पडली, त्याबाबत शेलारानी टीका केली आहे.