☯️ महत्वाच्या बातम्या☯️✴️30 एप्रिल 2023✴️

Spread the love

▶️ अमित शहा हे पुन्हा मुंबई दौऱ्यावर येत असल्याने राजकीय घडामोडींना वेग
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज, रविवारी पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत एका कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी ते येत असल्याचे सांगितले जात असले तरी राजकीय चर्चांना मात्र उधाण आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या १००व्या भागानिमित्त विलेपार्ले येथे होणाऱ्या कार्यक्रमात शहा हे सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

▶️ तरुणांनी तृणधान्य शेतीकडे वळावे, स्टार्टअपसाठीही पुढाकार घ्यावा – राज्यपाल रमेश बैस
ठाणे- भारताच्या नेतृत्वाखाली जगभर तृणधान्य म्हणजे श्री अन्नाला वेगळी ओळख मिळत आहे. महाराष्ट्रातील कृषि महाविद्यालयांमध्ये तृणधान्य/भरडधान्य म्हणजेच श्री अन्नावर मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे. राज्यातील विविध विद्यापीठातून दरवर्षी हजारो युवक पदवी घेऊन बाहेर पडतात. या युवकांनी भरडधान्याच्या शेतीकडे वळावे. तसेच त्यावर आधारित स्टार्टअप सुरू केल्यास मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

▶️ आयपीएलमध्ये मयंक मार्कंडेयने केला दिल्लीचा ‘करेक्ट कार्यक्रम’
सनराईजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या होमपीचवरच आस्मान दाखवलं आहे. कोणत्याही टीमला त्यांच्या होमपीचवर हरवणं तितकं सोपं नसतं. पण सनराइजर्स हैदराबादने ते करून दाखवलं आहे. कालच्या सामन्यात हैदराबादची केवळ गोलंदाजीच चालली नाही तर फलंदाजीही चालली. दिल्ली हा सामना जिंकेल असं काहीस चित्र दिसत होतं. पण हैदराबादच्या मयंक मार्कंडेयने अप्रतिम गोलंदाजी करत एका शानदार कॅचने संपूर्ण सामनाच पलटवला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page