☯️ शुक्रवार दि. १४ एप्रिल २०२३ दिनविशेष

Spread the love

🕉️ दिनविशेष🕉️

☯️ घटना..

▪️१९९५: टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.

▪️१९४४: मुंबई गोदीत उभ्या असलेल्या फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटी पौंड इतके आर्थिक नुकसान झाले.

▪️१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.

▪️१७३६: चिमाजीअप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करुन जंजिऱ्याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.

▪️१६६५: सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.

▪️१६६१: प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.

☯️ जन्म..

▪️१९४३: रामदास फुटाणे – वात्रटिकाकार

▪️१९२७: द. मा. मिरासदार – विनोदी लेखक

▪️१९२२: उस्ताद अली अकबर खान – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक – पद्म विभूषण, पद्म भूषण (निधन: १८ जून २००९)

▪️१९१९: शमशाद बेगम – पार्श्वगायिका (निधन: २३ एप्रिल २०१३)

▪️१९१९: के. सरस्वती अम्मा – भारतीय लेखक आणि नाटककार (निधन: २६ डिसेंबर १९७५)

▪️१९१४: शांता हुबळीकर – अभिनेत्री (निधन: १७ जुलै १९९२)

▪️१८९१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार – भारतरत्न (मरणोत्तर) (निधन: ६ डिसेंबर १९५६)

▪️१८७२: अब्दुल्ला युसुफ अली – भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक (निधन: १० डिसेंबर १९५३)

▪️१६७५: महाराणी ताराबाई भोसले – मराठा साम्राज्याच्या महाराणी (निधन: ९ डिसेंबर १७६१)

▪️१६२९: क्रिस्टियन हायगेन्स – डच गणितज्ञ, खगोलविद आणि पदार्थवैज्ञानिक (निधन: ८ जुलै १६९५)

☯️ निधन..

▪️२०१३: राम प्रसाद गोएंका – उद्योगपती (जन्म: १ मार्च १९३०)

▪️१९९७: चंदू पारखी – चित्रपट आणि नाट्य अभिनेते

▪️१९६२: सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया – स्थापत्य अभियंता आणि राजकारणी – भारतरत्न (जन्म: १५ सप्टेंबर १८६१)

▪️१९५०: वेंकटरमण अय्यर – भारतीय तत्त्ववेत्ते (जन्म: ३० डिसेंबर १८७९)

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page